सिंदेवाही (Cannibal Tigress) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्रात तेंदूपान संकलन करण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना वाघिणीसह बछड्याने हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे व लाइव्ह कॅमेरे लावून वनविभागाचे अधिकारी (Cannibal Tigress) वाघिणीसह बछड्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून आहे. दरम्यान, तीन महिलांवर हल्ला करणार्या वाघाची निश्चिती केल्यानंतर दि.१३ मे रोजी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते.
यानंतर १६ मे रोजी डोंगरगांव नियतक्षेत्रात कक्ष क्र. १३६० मध्ये डॉर्ट करून (Cannibal Tigress) वाघिणीच्या एका नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले होते . यानंतरही या घटनेतील बछड्यांचा वनविभागाकडून शोध सुरूच होता. दि.२७ मे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा दुसर्या नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. पुन्हा बछड्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.