तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाची मोठी कारवाई
औंढा नागनाथ (Reti Ghat Case) : तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या चिमेगाव धार वाळू घाट परिसरात वाळू माफियांनी अवैध साठा करून ठेवलेल्या वाळू साठ्यावर तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह पथकाने दिनांक 25 मार्च मंगळवार रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान कारवाई करून अंदाजे 55 ब्रास वाळूचा साठा (Reti Ghat Case) जप्त करत, सदरील वाळूसाठा वाहनाद्वारे औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून टाकण्यात येत आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने ही (Reti Ghat Case) कारवाई केली. पथकामध्ये तहसीलदार हरीश गाडे, तलाठी माधव भुसावळे, गजानन गुंजकर, संजय पाटील, अनिता पटवे, सचिन जोंधळे, गजानन हजारे, विशाल भूक्तर, नवले, पोले, विष्णू गिरी यांचा पथकात समावेश होता. अचानक झालेल्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.