एका कंत्राटदाराचा, दोन गटसचिवांचा आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेने तीनही आंदोलक ताब्यात
वर्धा (Self-Immolation Attempt) : शहरात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविध मागण्यांच्या अनुषंगाने वर्ध्यात तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यात एका कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या परिसरात तर दोन गटसचिवांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयापुढे (Self-Immolation Attempt) आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनांनी शहरात एकच खळबळ आणि यंत्रणेत धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत तिनही आंदोलकांना ताब्यात घेतले.
कंत्राटदारांचे देयक न मिळाल्याने कंत्राटदार बाबा जाकीर यांनी स्वातंत्र्यदिनाला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त होता. (Self-Immolation Attempt) कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके थकीत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. देयके मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदार बाबा जाकीर यांनी १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात मोठा बंदोबस्त होता. १५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कार्यालयाच्या जवळ येत कंत्राटदार बाबा जाकीर यांनी अंगावर द्रव पदार्थ ओतला. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी धावपळ करून बाबा जाकीर यास ताब्यात घेतले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे यांनी बांधकाम विभागाला निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. (Self-Immolation Attempt) आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सतीश अं.बोरे यांना कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले.