संबंधित विभागाला दिले निवेदन
वर्धा (Selu Congress Samiti) : सेलू तालुक्यातील टाकळी किटे फाट्यावरती ब्रेकर नसल्याकारणाने सेलू रोडनी व हमदापुर रोडने येणारे वाहने हे एकमेकांना भिडत असल्याकारणाने एक-दोन दिवसात नेहमीच अपघात होत आहे. या अपघातामुळे नागरिक हैराण झाले असून, या संदर्भात (Selu Congress Samiti) सेलू तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचे दिसत असून, त्यांनी ब्रेकरची मागणी साठी संबंधित विभागाला निवेदन सादर केले आहे.
ब्रेकर न दिल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. यावेळी (Selu Congress Samiti) सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अतुल पन्नाशे आम आदमी पार्टीचे सूर्या सोनोने असनूर शेख सुरज कडू आशिष चौधरी मनोज नाकतोडे प्रज्वल राऊत प्रवीण भल्लावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.