उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छालय स्वच्छता प्रकरण!
परभणी (Selu Municipality) : परभणीच्या सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) रुग्णांना वापरण्यासाठी असलेले स्वच्छालय अत्यंत घाण असून ते स्वच्छ करण्यासाठी परभणीतील सेलू नगरपालिकेचे लक्ष वेधावे म्हणून नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर बुधवार 2 जुलै रोजी बेशरमांची झाडे लावून या प्रकारचा निषेध (Prohibition) नोंदविण्यात आला आहे. या करण्यात आलेल्या आंदोलनामुळे (Aandolan) नगरपरिषद परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याबाबतची माहिती याप्रमाणे शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत घाण आहे. या उपजिल्हा रुग्णालयात रोज येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईक यांना या घाणेरड्या शौचालयामुळे (Dirty Toilet) मोठी गैरसोय होत आहे.
वारंवार सांगून देखील रुग्णांच्या या सुविधेकडे नगर पालिकेकडून दुर्लक्ष!
नाकाला रुमाल बांधून देखील या स्वच्छालयात बसता येत नसल्याने अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक थेट उघड्यावर शौचाला बसत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असलेले, हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलू यांना वारंवार सांगून देखील रुग्णांच्या या सुविधेकडे नगर पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने निषेध म्हणून आज बुधवार रोजी सेलु नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेशरमांची झाडे लावून नगर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या करण्यात आलेल्या आंदोलनाची नगर पालिकेने दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छालयाची साफसफाई केली नाही तर नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी जयसिंग शेळके, लालू खान, चंदू कदम, रफीक खन्ना, मोहन मोरे, मारोती ढोले, रोहित शेळके, ओम खेड़ेकर सह इतर उपस्थित होते.