Yawatmal :- जि. प. च्या बहुतांश शाळेत बि. एड. अहर्ता धारक शिक्षक कार्यरत असताना मात्र त्यांना माध्यमिक शिक्षक (Secondary teacher) म्हणून पदोन्नती मिळत नव्हती. आता मात्र जि. प. प्राथमिक शिक्षकांना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नती मिळण्याची संधी मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जि.प.शिक्षण विभागाकडून पदवीधर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची एकत्रित सेवाजेष्ठता न्यायालयाला सादर केली असून ती प्रसिध्द करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जि.प.शिक्षण विभागाची कारवाई
महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांच्या नेतृत्वात संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष महेंद्र वेरूळकर यांच्या नेतृत्वात उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट पिटीशन क्र.७९८८/ २०२२ दाखल केले होते. यात जि. प. माध्यमिक शिक्षक पदोन्नती करीता सेवा ज्येष्ठता यादीत जि. प. प्राथमिक शाळेतील बिएड अहर्ता धारक विषय शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालय (High Court), नागपूर खंडपीठ द्वारा १०/ ११/ २०२३ रोजी संयुक्त यादी मा. उच्च न्यायालयात सादर करण्याबाबत आदेश देण्यात आला. या आदेशानुसार दिं.२९/ ०१/ २०२४ रोजी जि. प. माध्यमिक शिक्षक पदोन्नती करीता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळातील वर्ग ६ते ८ करिता नियुक्त शिक्षक यांची यांची संयुक्त सेवाज्येष्ठता यादी मा. उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. .
१ एप्रिल २०२५ रोजी जि. प. शिक्षण विभागाने यासाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध करतांना फक्त माध्यमिक विभागातील विषय शिक्षकांचा समावेश केला होता. त्यावर संघटनेने आक्षेप नोंदवून मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर मा. उच्च न्यायालयाने २० जुलै २०२५ रोजी एकत्रित यादी १५ दिवसाच्या आत प्रकाशित करण्याचा आदेश दिले. या आदेशान्वये शिक्षण विभागाने १६ जुलै २०२५ रोजी जि. प. माध्यमिक शिक्षक पदोन्नती करिता जि. प. प्राथमिक शाळेतील वर्ग ६ते ८ करिता व माध्यमिक शिक्षक यांची संयुक्त तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.