अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांचा निकाल
हिंगोली (Hingoli murder case) : तालुक्यातील राहोली बु. येथे जुन्या शेतीच्या भांडणाच्या कारणावरून पाच ते सहा वर्षापूर्वी आरोपींनी शंकर लक्ष्मण डोरले यांच्या डोक्यात धारदार शस्त्र व लाथा बुक्याने मारहाण करून निर्घृणरित्या खून केल्याप्रकरणी हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एन.माने-गाडेकर यांनी शुक्रवारी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
अधिक माहिती अशी की, २१ मे २०१९ रोजी पो.स्टे. हिंगोली ग्रा. येथे फिर्यादी लक्ष्मण गणपती डोरले रा. राहोली बु.ता.जि. हिंगोली वय ५८ वर्षे, यांनी पो.स्टे. हिंगोली ग्रा. येथे फिर्याद दिली की, २१ मे २०१९ रोजी सकाळी अंदाजे १६.०० ते १६.३० वा.च्या दरम्यान आरोपी रमेश रामकिसन डोरले, विठ्ठल नामदेव घोंगडे, अंबादास नामदेव घोंगडे, रामकिसन पंडिता डोरले, नामदेव तुकाराम घोंगडे, ज्ञानेश्वर किसन बोरगड, मारोती विठ्ठल डोरले सर्व रा. राहोली बु.ता.जि. हिंगोली यांनी मिळून जुन्या शेतीच्या भांडणाच्या कारणावरून शंकर लक्ष्मण डोरले (मयत) याचा कुर्हाडीने डोक्यात मारून व (Hingoli murder case) लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निघृणपणे खून केला.
अशा फिर्यादी वरून पो.स्टे. हिंगोली ग्रा. येथे गु.रं.नं १४३/२०१९ कलम ३०२,१४३,१४७,१४९, भादंवी अन्वये नुसार आरोपी सरकार विरूध्द गणेश डोरले व इतर असा गुन्हा नोंदवून सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अंगद सुडके व जमादार अशोक धन्य यांनी केला. या प्रकरणात न्यायालयात सत्र खटला क्र. १२३/२०१९ देण्यात आला.
सदर प्रकरण हे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांचे समोर चालले सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे यांनी काम पाहिले. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. (Hingoli murder case) यामध्ये न्यायालयात फिर्यादी व ईतर साक्षीदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सदर गुन्हा करताना आरोपींनी नात्याचा, वयाचा सुध्दा विचार केलेला नाही.
सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. माने गाडेकर यांनी १० जानेवारी रोजी सत्र खटला क.१२३/२०१९ सरकार वि. गणेश डोरले या प्रकरणात सर्व सात आरोपी यांना कलम १४३ भादवि अन्वये ६ महिने कारावास व १० हजार दंड, कलम १४७ भादवी अन्वये २ वर्ष कारावास व १५ हजार दंड, १४८ भादवी अन्वये ३ वर्ष कारावास व २५ हजार रू.दंड कलम ३०२ व १४९ भादवी अन्वये एकत्रित जन्मठेपेची शिक्षा सुनावली व ५० हजार रू. दंड ठोठावला दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जमा दंड रकमेमधून रू.३ लाख मयताच्या पत्नी यांना देण्याचे आदेश पारित केले.
उपरोक्त प्रकरणात सरकार पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे यांनी बाजू मांडली व त्यांना अॅड.एस.एस. देशमुख व अॅड.एन.एस. मुटकुळे सरकारी वकील यांनी सहकार्य केले. व तसेच पोहेकॉ / २१० नंदकिशोर बी. जाधव व पोहेकॉ/६४८ पी.बी.धुर्वे पो.स्टे. हिंगोली ग्रा. यांनी सहकार्य केले