आरोपीस 3 दिवसाची पोलीस कोठडी!
मानोरा (Sexual Harassment) : तालुक्यातील एका गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी मानोरा पोलिसांनी एका विवाहित व्यक्तीस अटक केली आहे. पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अविनाश चापले (वय 35, रा. देऊरवाडी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) याला दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
मानोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद!
सदर अल्पवयीन मुलगी ही आपल्या आजोबांच्या घरी पाहुणी म्हणून आली होती. मात्र 25 ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याने तिचे आजोबा यांनी 27 ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये (Manora Police Station) तक्रार नोंदवली होती. त्या आधारे पोलिसांनी कलम 137 ( 2 ) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की सदर मुलगी ही आरोपी अविनाश चापले याच्या घरी, देऊरवाडी येथे असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे जमादार राठोड, पोलिस कर्मचारी आशिष एकाडे आणि महिला पोलिस शर्विनी पखाले यांनी तातडीने तेथे जाऊन अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांना ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वाढ करून आरोपीस अटक!
पोलिस स्टेशनमध्ये मुलीची जबानी घेतली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यात कलम 64 ( 2 ) (आय) (एम), 69 बी.एन.एस. सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अंतर्गत कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्ह्यात वाढ करून आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामटेके करीत आहेत. संपूर्ण तपास महीला ठाणेदार पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तिन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून अशा गुन्हा विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.