मुंबई (Shah Rukh Khan Death Threat) : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. (Shah Rukh Khan) शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत सलमान खाननंतर आता किंग खानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्यानुसार सलमान खाननंतर आता त्याचा चांगला मित्र आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून किंग खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आहे.
Mumbai | Case registered against an unidentified person at Bandra Police Station in Mumbai for allegedly giving a threat to actor Shah Rukh Khan. Offence u/s 308(4), 351(3)(4) BNS registered. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/wE0fdO8sd9
— ANI (@ANI) November 7, 2024
वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
माहितीनुसार, शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस रायपूरमध्ये पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्यापासून त्याचा फोन बंद आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या?
सलमान खानला (salman khan) लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. एवढेच नाही तर एप्रिल 2024 मध्ये मुंबईतील वांद्रे भागात सलमान खानच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. याशिवाय त्यांची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दिकीची हत्या
ऑक्टोबर 2024 मध्ये सलमान खानच्या अगदी जवळचे बाबा सिद्दिकी यांचीही सार्वजनिकरित्या हत्या करण्यात आली होती. या घटनेने सलमान खान (salman khan) चांगलाच भारावून गेला. या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वतीने सांगण्यात आले की, सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याच्या निकटवर्तीयांनाही असेच सामोरे जावे लागेल. सलमान खाननंतर (salman khan) आता शाहरुख खानवरही (Shah Rukh Khan) अडचणीचे ढग दाटून आले आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणाच्याही बाजूने अधिकृत वक्तव्य आलेले नाही.