नागपूर (Shalimar Express Derail) : नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शालिमारहून येणारी शालिमार एक्सप्रेस अचानक रुळावरून घसरली. ही (Shalimar Express Derail) गाडी स्थानकावर येताच तिचे S1 आणि S2 डबे रुळावरून अचानक घसरले. मात्र, अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. या (Itwari Railway Station) घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू असून रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येत आहे.
कल्याणमध्येही घडली ही घटना
अलीकडेच कल्याण जवळ काही दिवसांपूर्वी आणखी एक रेल्वेगाडी (Shalimar Express Derail) रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर सीएसएमटीच्या दिशेने जात असताना लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. या (Itwari Railway Station) घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला. रुळावरून घसरल्यानंतर, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल हा स्लो स्पीड ट्रॅक तात्पुरता बंद करण्यात आला. ज्यामुळे अनेक गाड्या वळवण्यात आल्या आणि लोकांची मोठी गैरसोय झाली.
दिबालाँग स्थानकातही ट्रेन रुळावरून घसरली
रेल्वे अपघातांमध्ये आसाममधील डिब्लॉन्ग स्टेशनजवळ एक ट्रेनही रुळावरून घसरली, ज्यामध्ये 8-10 डबे रुळावरून घसरले. ही (Shalimar Express Derail) ट्रेन मुंबईतील आगरतळा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावत होती. मात्र, इतर घटनांप्रमाणे या (Itwari Railway Station) घटनेतही कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ट्रेनमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.” कोणीही जखमी झाले नाही, यावर त्यांनी भर दिला. या घटनेनंतर बाधित लोकांना माहिती आणि मदत देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला.
