निटूर (Insurance company) : निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, या मागणीसाठी निलंगा येथील तालुका विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्चीला बेसरमाचे हार घालण्यात आला. अखिल भारतीय छावा संघटनेने हे आंदोलन केले.
शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील सर्व शेतकऱ्याना सरसकट (Insurance company) विमा देण्यात यावा. एकाच सर्वे नंबरमधील एकाच गट नंबरमधील एका शेतकऱ्यास विमा मिळाला तर दुसऱ्या शेतकऱ्यास विमा मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ई पीक पाहणी करता आलेली नाही. असे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्याचबरोबर अनेकांचे ई-पीक पाणी होऊनही त्यांना विमा मिळालेला नाही. त्यामुळे सदर सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा द्यावा, अशी मागणी करीत छावा संघटनेच्या वतीने निलंगा कृषी अधिकारी तालुका कार्यालय निलंगा व विमा अधिकारी विमा कंपनी कार्यालय निलंगा या दोन्ही कार्यालयाचा निषेध केला.
येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट (Insurance company) विमा नाही दिला तर विमा कंपनीच्या लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा छवा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी दिला. यावेळेस निलंगा तालुक्यातील शेतकरी व छावाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.