गडचिरोली (Gadchiroli Airport) : प्रस्तावित विमानतळासाठी जागा अधिग्रहण स्थगीत करण्यात यावे यासाठी कनेरी येथील शेतकरी शरद ब्राम्हणवाडे यांनी २८ एप्रिलपासून मुरखळा येथिल सर्वे नं.३२४/२ मध्ये उपोषणास बसण्याचा ईशारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून दिला आहे.
ब्राम्हणवाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित नागपूर यांच्या प्रस्तावित भुसंपादनास माझा वैयक्तीक विरोध आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी यांना कनेरी, पुलखल, मुरखळा, नवेगांव, मुडझा बु. व मुडझा तुकुम या सर्व गावाच्या वतीने ग्रामसभेचे ठराव देवून (Gadchiroli Airport) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित नागपूर यांना भुसंपादनास विरोध केला होता. असे असतांनाही भुसंपादन करण्याची प्रक्रिया कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाही यादीमध्ये बरेच शेतकरी हे भुमीहीन होत असून मी सुध्दा भुमीहीन होत आहे . मी सन १९९३ पासून धानाचे शेतीवर अवलंबून असुन मी धान पिकावर प्रक्रिया उद्योग सुरु केला असून आजतागायात माझा सदर उद्योग सुरु आहे.
आपण भुपंसादन करीत असलेल्या प्रक्रियेमध्ये माझा सदर उद्योग सुध्दा येत असून मी उद्योग विरहीत होणार असून भुमीहीन होत आहे. त्यामुळे मी व्यक्तीशा या प्रस्तावित विमानतळ कंपनीला माझा उद्योग व शेती देण्यास व्यक्तीशः विरोध दर्शवित असून मी स्वतः दिनांक २८ एप्रिल पासून मुरखळा येथिल सर्वे नं.३२४/२ मध्ये आमरण उपोषणास बसत आहे. प्रस्तावित केलेली खाजगी जमीन ही (Gadchiroli Airport) खाजगी विमान कंपनीला देवू नये अशीही मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.




