बुलढाणा शहरात प्रथमच शिवराज्याभिषेक दिन सोहळा!
बुलढाणा (Shiv Rajyabhishek Day) : भव्य-दिव्य शिवस्मारकावर तथा फक्त महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आज शुक्रवार ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek Day) सोहळ्याचा थाट बघायला मिळाला. सनई चौघड्याचा निनाद, छत्रपती शिवरायांच्या जयघोषात दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून छत्रपतींची महाआरती झाली, अन् शिवप्रेमी प्रफुल्लित झाले.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या ३५२व्या शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek Day) सोहळ्याच्या निमित्ताने सूर्योदयसमयी राजमाता चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात तर सकाळी संगम चौकातील शिवस्मारकावर युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, सौ.पूजाताई संजय गायकवाड व (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्याहस्ते महाआरती तसेच पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, धर्मवीर आखाडा तथा शिवस्मारकाच्या वतीने बुलढाणा शहरात आज ६ जून रोजी प्रथमच भव्यदिव्य शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास आलेल्या संगम चौकामधील सद्यस्थितीतील भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात उंच ५१ फुट हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ (Shiv Rajyabhishek Day) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) तसेच महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते फटाक्यांच्या आतष बाजीमध्ये, सनई चौघडाच्या निनादात हिंदवी स्वराज्य संस्थापक (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती तसेच दुग्धाभिषेक सोहळा, पूजन संपन्न झाले.

यावेळी त्या ठिकाणी असंख्य मान्यवर मंडळी शिवप्रेमी माता-भगिनी परिसरातील नागरिक (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती श्री शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सार्वजनिक उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्योदयसमयी पहाटे (Shiv Rajyabhishek Day) छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात सचिन गायकवाड यांच्या नियोजनातून महाआरती उत्सव संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग, गजेंद्र दांदडे, मोहन पर्हाड, अरविंद होंडे, वैशाली ठाकरे, गायत्री सावजी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
पूर्वसंध्येला रंगले शिवव्याख्यान..
शिवराज्याभिषेक दिनाच्या (Shiv Rajyabhishek Day) पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवार ५ जून रोजी बुलढाणा अर्बनच्या गोवर्धन सभागृहात शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे अभ्यासपूर्ण तेवढ्याच चित्तवेधक व्याख्यानाने शिवप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी युवानेते मृत्युंजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) उद्घाटन तर समारोप ऋषिकेश जाधव यांनी केला. कर्नल सुहास जतकर, प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्यासह शेकडो प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजनामाची भूमिका विषद केली.
‘प्रतापगड पर्व’ विषयावर बोलताना शिवव्याख्याते प्रशांत देशमुख म्हणाले की, आपल्याला अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला ? हे माहिती असतं.. अनेक नाटकांतून मालिकांतून चित्रपटांतून आपण हे पाहिलेलं असतं. परंतु त्या अफजलखानाला प्रतापगडाच्या माचीवर आणण्यासाठी राजांनी कोणतं बुद्धी कौशल्य वापरलं व अफजलखानाला त्याच्या कुल लष्करासहित बुडवण्यासाठी कोणती युद्धनीती वापरली याविषयी मात्र फारसं माहीत नसतं. शिवरायांनी आपल्या सैन्याचा आत्मबळ कसं वाढवलं? रणभूमी प्रतापगडच का निवडला? शिवरायांनी खानाला भ्रमात कसं ठेवलं? कान्होजी जेधेसारखी माणसं निष्ठेने राजांच्या बाजूने कशी उभी राहिली? अफजलखानाला बुद्धीच्या ताकदीवर जावळीच्या खोर्यात कस आणलं?
युद्धाची रणनीती कशी आखली? खानाला मारल्यानंतरही विजय साजरा करत न बसता पुढची मोहीम ताबडतोब राजांनी आखून पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश कसा मिळविला.. या सर्व गोष्टींची बारकाईनं (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी मांडणी केली. दोन तास जणू आपण शिवकाळात जावळीच्या खोर्यातच गेलेलो होतो, असा अनुभव श्रोत्यांना आला. जणु तो इतिहास आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे, असं श्रोत्यांना वाटत होतं. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ.गायत्री सावजी यांनी तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शैलेश खेडकर यांनी केले.




