शिवसेना महानगर प्रमुख प्रविण देशमुख यांची माहिती
परभणी (Pravin Deshmukh) : महानगर पालिका क्षेत्रातील मध्यवस्तीतील ६२१ मालमत्ता धारकांना राज्य वक्फ बोर्डाच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ स्थगीतीचे आदेश देण्याची सुचना अल्पसंख्यांक सचिवांना देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते महानगर प्रमुख (Pravin Deshmukh) प्रविण देशमुख यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी नगर वक्फ बोर्डाचे अधिकारी जुनेद सौय्यद यांनी शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या ६२१ मालमत्ता धारकांना मे व ऑगस्ट महिण्याच्या तारखा असणार्या नोटीसा बजावून ३ ऑक्टोंबर पर्यंत खुलासा सादर करा अन्यथा एकतर्फी निर्णय घेवू असा निर्णय दिला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात कमालीची भितीचे अणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापारी संघटनांच्या मते या मालमत्तांचे व्यवहार कायदेशीर असून कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर ताबा घेण्यात आला नाही. या नोटीसीमुळे मालमत्ता धारकांच्या चिंतेत भर पडली असून तात्काळ स्थगीती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महानगर प्रमुख प्रविण देशमुख यांनी केली. त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या नोटीशींना स्थगीती देण्याचे आदेश अल्पसंख्यांक विभागाच्या सचिवांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती शिवसेना महानगर (Pravin Deshmukh) प्रमुख प्रविण देशमुख यांनी दिली आहे.