हिंगोली (Shivendra Singh Raje Bhosale) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Singh Raje Bhosale) हे उद्या बुधवार दि. 9 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 9 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता सेलू येथून हेलिकॉप्टरने हत्ता ता. सेनगाव कडे प्रयाण. 11.15 वाजता हत्ता हेलिपॅड वर आगमन व शासकीय वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. 11.25 वाजता हत्ता येथील कार्यक्रम स्थळी आगमन व भूमीपूजन कार्यक्रम तसेच नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता शासकीय वाहनाने हत्ता हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 1.40 वाजता हत्ता हेलिपॅड येथून खाजगी हेलिकॉप्टरने हिंगोली कडे प्रयाण. 1.50 वाजता पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे आगमन व शासकीय वाहनाने बळसोंड, हिंगोली कडे प्रयाण. 2 वाजता बळसोंड येथील आ. मुटकुळे यांच्या यमुना निवासस्थान येथे आगमन व राखीव. 2.50 वाजता बळसोंड हिंगोली येथून शासकीय विश्रामगृह हिंगोली कडे प्रयाण. 3 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड विभागाची आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 4 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून वडकुते निवास नाईक नगर हिंगोली कडे प्रयाण. 4.15 वाजता वडकुते निवास येथे आगमन व माजी विधानसभा सदस्य रामराव वडकुते यांच्या निवासस्थानी आगमन व भेट. 4.30 वाजता मोटारीने पोलीस कवायत मैदान हेलिपॅड हिंगोलीकडे प्रयाण. 4.50 वाजता पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण करणार आहेत.




