कन्हान (Shravan Sari Sohala) : श्रावण महिन्यात योग सखी व योग नुत्य परिवार व्दारे श्रीराम नगर उदय नगर चौक रिंग रोड नागपुर येथे महिलांनी विविध कार्यक्रम सादर करून श्रावण सरी सोहळा (Shravan Sari Sohala) थाटात साजरा करण्यात आला.
योग सखी व योग नुत्य परिवार व्दारे आयोजित श्रावण सरी (Shravan Sari Sohala) कार्यक्रमाचे हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या सपोनि श्रीमती चंदा दंडवते मॅडम यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी पीएसआय मेघा लुटे मॅडम तर योग नृत्य व योग सखी परिवाराच्या संचालि का छाया कुरुटकर यांच्या अध्यक्षेत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित अतिथीना भारता चं संविधान देऊन सत्कार करण्यात आला. समाज सुधारकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याचमुळे आपण आज गगनात उंच भरारी घेऊ शकत आहोत. असे मा. चंदा दंडवते मॅडम हयानी संबोधित केले.

तसेच मा. मेघा लुटे मॅडम म्हणाल्यात की आपण महिला आज जो मोकळा श्वास घेत आहोत. त्याचं श्रेय जोतिबा व सावित्रीबाई फुलेंना जातं. महिलांनी उखाणे, श्रावण झुला, नक्कल, नृत्य, विविध खेळाच्या माध्यमातुन आपल्यातील सुप्त कला गुणांचे मनोरंज त्माक उत्कृष्ट सादरीकरण केले. हया सोहळ्यात ९० महिलांनी सहभाग घेतला होता. सुत्रसंचालन शुभांगी भागवतकर हयानी तर आभार सोनु खांबलकर हयानी व्यकत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माधुरी लाडेकर, चंदा नरड, सोनाली कडु, गायत्री बोरकर, प्रिया तिरपुडे, गायत्री दरणे, प्रज्ञा भगत, प्रिया कडु, पल्लवी बालपांडे, लता खांबलकर, संस्कृती बालपांडे, रूपा झिलपे, दिपा गजघाटे, किर्ती काळे, विजया बावणे, विद्या लडके, छाया वानखेडे, प्रीती वानखेडे आदीनी सहकार्य केले.




 
			 
		
