शिरपूर (Immoral relationship Case) : पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम खंडाळा शिंदे येथील श्रीकृष्ण पांडुरंग शिंदे वय ३५ वर्ष या विवाहित तरुणाचा पत्नी व प्रियकराच्या अनैतिक संबंधाला (Immoral relationship Case) अडसर निर्माण करत असल्याच्या कारणावरून पत्नी व प्रियकराने मिळून निर्घृनपणे हत्या केल्याची बाब पोलिसांच्या तपासात सिद्ध झाली आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिरपूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत श्रीकृष्ण पांडुरंग शिंदे हा ४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी रात्री झोपलेला होता दुसर्या दिवशी पाच जून रोजी सकाळपर्यंत झोपेतून उठलाच नाही म्हणून त्याची पत्नी शारदा श्रीकृष्ण शिंदे हिने (Immoral relationship Case) मृतकाच्या भावाला सांगितले होते. मृतकाच्या भावाने मयताची पाहणी केली असता त्याचा भाऊ त्याला मयत स्वरूपात दिसून आला. त्यामुळे पाच जून रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे त्याने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.व मृतकाचे शरीर शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानुसार पो. उपनिरीक्षक इमरान पठाण यांनी सरकारतर्फे स्वतः फिर्याद दाखल करून हत्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून गुप्त माहीतीच्या आधारे मृतकाच्या पत्नीची कसून चौकशी केली असता हनुमान पांडुरंग श्रीखंडे शेलगाव याच्यासोबत तिचे अनैतिक प्रेम संबंध होते अशी माहिती मिळाली . त्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला . आरोपी हनुमान पांडुरंग श्रीखंडे याची कसून चौकशी केली असता मृतकाच्या पत्नीचे व त्याचे अनैतिक प्रेम संबंध होते.
या (Immoral relationship Case) अनैतिक संबंधात मृतक हा अडसर निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मनात रोष धरून ४ जून रोजी रात्री मृतक त्याच्या घरात झोपलेला असताना मृतकाची पत्नी व प्रियकराने मिळून झोपेतच त्याचा गळा दाबून त्याला जीवाने ठार मारण्याचे सांगितले. दरम्यान दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना मालेगाव न्यायालयापुढे हजर केले असता त्या दोघांना ११ जून २०२५ पर्यंत या आरोपींना पोलीस कस्टडी मिळाली आहे. (Immoral relationship Case) सदर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. केशव वाघ ,पोलीस उपनिरीक्षक इम्रान पठाण व इतरांनी केला.