आजी – आजोबाला भेटण्यासाठी जात होते दोन्ही भाऊ
आखाडा बाळापूर (Tipper Accident) : कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी येथे आजी -आजोबा यांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा टिप्परच्या धडकेत रविवारी रात्री दहा वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेले चौघेजण अपघातात जख्मी झाले. जख्मीवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालय नांदेड येथे जख्मीना हलवण्यात आले होते. सोमवारी दुपारी तेथे (Tipper Accident) जख्मीवर उपचार सुरू होते, अशी माहिती रामेश्वर तांडा पोलीस चौकी बिटप्रमुख सुनील रिठ्ठे यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील कुपटी येथील संतोष माहुरे हे कामानिमित्त अनेक वर्षांपासून पुणे येथे राहतात. हिंगोली येथे नातेवाईकाचे लग्न असल्याने ते कुटुंबासह आले होते. लग्न झाल्यावर अरविंद अरविंद संतोष माहुरे (१८) व अनिकेत संतोष माहुरे (१६) हे दोघे सख्खे भाऊ कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी येथे आजी – आजोबा यांना भेटण्यासाठी मोटार सायकल क्रमांक ३८ एजी १३३९ यावरून आले होते. भेटून झाल्यावर ते मित्रांसोबत कोपरवाडी गावाजवळ थांबले असता रात्री १० वाजता बोथी तलावातून माती घेऊन कोपरवाडीकडे जाणार्या भरधाव वेगातील टिप्पर क्रमांक एमएच ३८ एक्स २२८८ च्या चालकाचे आपल्या (Tipper Accident) वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा जणांना धडक दिली.
यात अनिकेत संतोष माहुरे (१७) अरविंद संतोष माहुरे (१६) दोघे रा.कुपटी ता. वसमत, वैभव अंकुश डुकरे (१८), गजानन बालाजी मुकाडे (१८) दोघेही रा.कोपरवाडी, संदीप बाबुराव मारकड (२१) रा. कोपरवाडी, अनिकेत बालाजी मुळे (१८) हे जख्मी झाले होते. त्यांना तात्काळ आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नांदेड हलविण्यात आले. अनिकेत व संतोष या दोन भावंडांना जास्त मार लागला होता. त्यांना नांदेड रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. १९ मे रोजी नांदेड येथे दोन्ही मयतांचे शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईाकंच्या स्वाधीन करण्यात आला.
घटनास्थळी रात्री पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, बिटप्रमुख सुनील रिठ्ठे, शिवाजी पवार, विजय जाधव पोलीस पथकाने भेट दिली. सोमवारी सकाळी शासकीय रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बिटप्रमुख सुनील रिठ्ठे यांनी जखमींचे जवाब घेतले. यामध्ये (Tipper Accident) अपघातातील चालकाने टिप्पर घेऊन पलायन केल्याने आ. बाळापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा संतोष माहोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोटके हे करीत आहेत.
वसमत तालुक्यातील कुपटी येथील अनिकेत माहोरे, अरविंद माहोरे या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आ. बाळापूर पोलिसात संतोष माहोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.