केळी पाझर तलावाचेही पुनर्जीवन होणार
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राजू पाटील नवघरे यांच्या बैठकीत निर्णय
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राजू पाटील नवघरे यांच्या बैठकीत निर्णय
वसमत (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) : वसमत विधानसभा मतदारसंघातील हजारो हेक्टर शेत जमीन आणि कोरडवाहू भागाचे नंदनवन करणारी महत्त्वकांक्षी व महत्त्वपूर्ण सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राजू पाटील नवघरे यांच्या संयुक्त बैठकीत या योजना योजना मार्गी लावण्याचा निर्णय तर झालाच सोबत केळी येथील पाझर तलावाचे पुनर्जीवन करण्यावरही शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार राजू पाटील नवघरे यांनी जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सतत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. यात वसमत विधानसभा मतदारसंघातील (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना व केळी पाझर तलाव पुनरुज्जीवन या प्रकल्पांची अंमलबजावणी हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन या योजना मार्गी लावण्यासाठी आमदार नवघरे यांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत या योजना कार्यान्वित झाल्यास वसमत मतदारसंघाचा सिंचन अनुशेष निश्चितच दूर होणार असल्याचे आमदार नवघरे यांनी अजितदादा पवार यांना पटवून दिले आहे.
सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना, आणि केळी (ता. औंढा नागनाथ) येथील पाझर तलावाचे पुनरुज्जीवन या योजना कार्यान्वित करण्यासाठी 5 जून रोजी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत दोन्ही प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
केळी पाझर तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे औंढा तालुक्यातील केळी, केळी तांडा, पार्डी, सावळी, एळी, हिवरखेडा, उंडेगाव, चिंचोली निळोबा, जलालपूर, नांदखेडा, पेरजाबाद, साळणा, लांडाळा, रामेश्वर, दौडगाव या 15 गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पंधरा गावातील हजारो हेक्टर शेती जमिनीत पाणी पातळी वाढणार आहे पिण्याच्या पाण्याचा वास सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे केळी पाझर तलावाच्या कालव्याचे सर्वेक्षण करण्यास मान्यता प्राप्त झाली असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघातील (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) औंढा व वसमत तालुक्यासाठी वरदान ठरणारी सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही योजना कार्यान्वित झाल्यास वसमत तालुक्यातील 19 आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील एकूण 6000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही योजना पूर्ण झाल्यानंतर वसमत तालुका खऱ्या अर्थाने ओलीताखाली आला असे म्हणता येईल. या बैठकीस (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मुख्य अभियंता (संभाजीनगर), अधीक्षक अभियंता (नांदेड पाटबंधारे), कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे हिंगोली आणि पूर्णा पाटबंधारे विभाग), तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार नवघरे यांचे भगीरथ प्रयत्न
वसमत विधानसभा मतदारसंघातील कोरडवाहू जमिनीला ओलिताखाली आणण्यासाठी आमदार राजू पाटील नवघरे यांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. मतदारसंघाच्या सिंचनाच्या प्रश्नाकडे आजपर्यंत कोणी गांभीर्याने पाहिले नाही मात्र आमदार नवघरे यांनी सिंचनाचा मुद्दा प्राधान्याने हाती घेतला व सिंचनाच्या योजना पूर्ण करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले आहेत. त्या त्यांना यशही मिळत आहे. (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी देशोन्नती बोलताना या दोन्ही योजना लवकरच मार्गी लागतील वया दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार होईल. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडणार नाही. यासाठीच आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
पूर्णा प्रकल्पामुळे (Siddheshwar Upsa Irrigation Yojana) वसमत तालुका पाणीदार तालुका म्हणून ओळखला जात असला तरी अजूनही वसमत विधानसभा मतदारसंघातील वसमत तालुक्यातील अनेक गावात सिंचनाचा प्रश्न कायम आहे आतापर्यंत लोकप्रतिनिधींचे सिंचनाच्या मुद्द्याकडेलक्ष नव्हते. सिंचनाच्या मुद्द्यावर कोणी गांभीर्याने काम केले नाही त्याचा फटका मतदारसंघाला बसला यात शंका नाही. शिरड शहापूर चोंडी शिरळी वाई आंबा या गावांसह वसमत व औंढा तालुक्यातील 50 ते 60 गावात सिंचनाचा प्रश्न मोठा आहे सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना मृगजळ ठरत होती. आमदार नवघरे यांनी सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना कागदावरून प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले भगीरथ प्रयत्न वसमत तालुक्याचे भाग्य बदलणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 5 जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाने वसमत मतदारसंघातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.