राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पोहोचणार घरोघरी!
लातूर (Signature Campaign) : देशाची लोकशाही वाचविण्यासाठी व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समर्थन देण्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने सह्यांची मोहीम उद्यापासून सुरू होत असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके (Abhay Salunke) यांनी मंगळवारी (दि.19) पत्रकार परिषदेत दिली.
देशात निवडणूक आयोग मूळ प्रश्नांपासून पळत आहे!
देशात निवडणूक आयोग (Election Commission) मूळ प्रश्नांपासून पळत आहे. मत चोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळत असून देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याने देशातील बुद्धीवादी, विचारवंतांची मान शरमेने खाली जाईल, असे ते वक्तव्य होते. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी दुरुत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला किरण जाधव, प्रवीण सूर्यवंशी, इमरान सय्यद, युनूस मोमीन, आकाश भगत, शिल्पाताई पाटील, अशोक गोविंदपूरकर, समद शेख, सिकंदर पटेल उपस्थित होते.
फेर मतमोजणी नव्हे, तर प्रात्यक्षिक!
निवडणुकांमध्ये (Elections) घोळ झाल्याचे लक्षात आल्याने, विधानसभा निवडणूक निकाल लागताच शंका आल्याने त्यावेळी काँग्रेसने तक्रार केली होती. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे निवडणूक आयुक्त, लातूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि लातूरचे निवडणूक निरीक्षक करुणा कुमारी यांच्याकडे या तक्रारी करण्यात आल्या होत्या, असा दावा अभय साळुंके त्यांनी यावेळी केला. निवडणूक निकालानंतर काँग्रेसने निवडणूक विभागाकडे सी.डी. मागितली. मात्र 45 दिवसांनी ती देता येते, असे निवडणूक विभागाने सांगितले. 45 दिवसानंतर माहिती मागितली, मात्र 45 दिवसांनी मुदत संपल्याचे कारण न्यायालय सांगणार म्हणून हा विषय घोळ घालणार आहे. प्रत्येक बूथला 47 हजार रुपये या नियमानुसार एका बूथसाठी रक्कम भरून निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी अर्ज दिला. मात्र निवडणूक विभागाने फेर मतमोजणी नव्हे, तर मशीनचे प्रात्यक्षिक दाखविणार असे म्हटल्याने आपण रक्कम परत घेत हा विषय सोडून दिला, असेही साळुंके म्हणाले.