बुलढाणा (Buldhana Sports Championship) : आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक मान्यता प्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन २०२८ चे ऑलम्पिक खेळामध्ये सामाविष्ट असलेल्या खेळ असुन लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मान्यतेने लेक्रॉस असोशिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे अधिपत्याखाली लेक्रॉस असोशिएशन पुणे यांचे वतीने राज्यस्तरीय लेक्रॉस क्रिडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्क्वेंश अकॅडमी, उंद्री, पुणे येथे दिनांक १४, १५ एप्रिल २०२५ दरम्यान सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने B(uldhana Sports Championship) बुलढाणा जिल्हा लेक्रॉस संघाचे निवडचाचणी हि दिनांक १३/४/२०२५ रोजी जिजामाता क्रीडा संकुल बुलढाणा येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा गुणवंत जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कर प्राप्त श्रीराम निळे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जिल्हा निवड चाचणीतुन खालील निवड झालेला संघाने राज्यस्तरी लेक्रॉस स्पर्धेत सहभागी होवुन सब ज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले, सिनिअर मुले या तिन्ही गटामधील खेळाडूंनी राज्यस्तरी स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघाने आंतरराष्ट्रीय खेळाडु तथा प्रशिक्षक श्रीराम निळे यांचे मार्गदर्शनाखाली व्दितीय क्रमांक (रौप्य्पदक) संपादन केला.
सब ज्युनिअर वयोगट १७ वर्ष मुले गटामध्ये आर्यन गिरी (कर्णधार) शिवराज निळे, अशिष आंधळे, समीर चौधरी, पिवुश दराडे, शेख कैफ, सोहम काटकर, शिवम जाधव, अनिकेत वेडवाल, केयुर पवार ज्युनिअर गट वयोगट १९ वर्ष मुले शिवराज निळे (कर्णधार) आर्यन गिरी, अशिष आंधळे, समीर चौधरी, पिवृश दराडे, शेख कैफ, सोहम काटकर, शिवम जाधव, ओम भगत, हर्षद शेख, अनिकेत हेलोडो, केयूर पवार, सिनिअर गटामध्ये सागर बोर्ड, राहुल चांदणे, इमरान शेख, सोहील रेगीवाले, अनिस शेख, पार्थ जोग, सिद्धेश्वर सोळंके, शकंर राख, सतिष जायभाये, आकाश सांगळे, शिवराज निळे, शहवाज वागवान यांनी खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करुन राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्हा नाव लौकिक केले. दिनांक २९, ३० एप्रिल २०२५ दरम्यान आग्रा येथे होणारे लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हयातील खेळाडुची निवड प्रशिक्षण शिबिरामधून महाराष्ट्र संघात निवड करण्यात येणार आहे.
वयोगट १७ वर्षमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून आर्यन गिरी व ज्युनिअर गटामध्ये समीर चौधरी, सिनिअर गटामध्ये सागर सागर बोर्डे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने मॅन आफ द मॅच म्हणुन वॉच देण्यात आले. राज्य लेक्रॉस संघटनेचे अध्यक्षा श्रीमती डॉ. सुमेधा ठाका, जनरल सचिव डॉ. मोहद बाबर, पुणे जिल्हा लॅक्रोस असोशिएशन अध्यक्ष प्रदीप खांड्रे यांनी (Buldhana Sports Championship) बुलढाणा जिल्हाचे विजय सर्व ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर मुले या तीन संघाने व्दितीय क्रमांची ट्रॉफी देवुन गौरविण्यात आले. बुलढाणा जिल्हा लॅक्रोस असोशिएशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती निळे, सचिव दिपक माठे, निलेश इंगळे, प्रकाश करंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे यांनी विजयी खेळाडुंचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.