परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील महाविष्णू तांडा येथील घटना
परभणी/सोनपेठ (Sonpeth Accident) : परभणी ते सोनपेठ या महामार्गावर महाविष्णू तांडा येथे दुचाकी – चारचाकीचा अपघात (Two-wheeler accident) झाल्याची घटना बुधवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. अपघातातील जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेळगाव येथील बाळासाहेब बागवाले व इरफान काझी हे दोघे एम.एच. २२ ए.टी. ४३५३ या दुचाकीने सोनपेठकडे जात असताना एम.एच. ४३ ए.झेड. ०९०९ या चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली. दुचाकीवरील दोघे जखमी झाले. बाळासाहेब बागवाले यांना लातुर येथे तर इरफान काझी यांना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान इरफान काझी यांचा मृत्यू झाला. (Sonpeth Accident) अपघातानंतर चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला खड्ड्यात गेले. वाहनातील इसम घटनास्थळावरुन पसार झाले.
या दरम्यान पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी सोनपेठ वरुन परभणीकडे जात होते. गर्दी पाहून त्यांनी आपले वाहन थांबविले. (Sonpeth Accident) अपघात स्थळाची पाहणी केली. घटनेची माहिती मिळताच पोनि. सुर्यमोहन बोलमवाड, पोउपनि. अजय किरकन, पोउपनि. नंदीकेश्वर कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली..