बेटिंग अॅप प्रकरणात चौकशी!
नवी दिल्ली (Sonu Sood) : बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात अभिनेता सोनू सूद आज ईडी कार्यालयात पोहोचला. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेकायदेशीर बेटिंग अॅप (Illegal Betting App) 1xBet प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यापूर्वी अभिनेत्री अन्वेशी जैन आणि क्रिकेटर युवराज सिंग यांनाही ईडीने या प्रकरणात समन्स बजावले आहे.
अन्वेशी जैन आणि युवराज सिंग यांचीही ईडीसमोर चौकशी करण्यात आली!
सोनू सूदच्या आधी अभिनेत्री अन्वेशी जैन (Actress Anveshi Jain) आणि क्रिकेटर युवराज सिंग (Cricketer Yuvraj Singh) देखील काल या प्रकरणात ईडीसमोर हजर झाले. गेल्या काही आठवड्यात ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहे. या बेकायदेशीर बेटिंग अॅपच्या संदर्भात ईडी सातत्याने अनेक प्रमुख व्यक्तींना समन्स बजावत आहे.
1xBet अॅप म्हणजे काय?
1xBet हे बेटिंग अॅप आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे ॲप गेल्या 18 वर्षांपासून सट्टेबाजीच्या व्यवसायात आहे. ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात. व्यक्ती आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) आणि करचोरीच्या आरोपांमुळे अंमलबजावणी संचालनालय (ED) अशा अनेक बेकायदेशीर ॲप्सवर व्यापक कारवाई करत आहे. 2023 मध्ये, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 174 बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्ससह 1xBet वर बंदी घातली. ही चौकशी कथित बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्सशी संबंधित आहे. असा आरोप आहे की, या सट्टेबाजी ॲप्सनी असंख्य व्यक्ती आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे किंवा मोठ्या प्रमाणात कर चुकवला आहे.