औंढा नागनाथ (Aundha Nagnath Police) : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुरूवारी (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ पोलीस ठाण्यास भेट देऊन इमारतीसह पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली.
नांदेड परीक्षेचे विशेष पोलीस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक १६ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी सव्वा दहा वाजता (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यास भेट दिली यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली यानंतर त्यांनी ठाणे इमारत तसेच कामकाजाची पाहणी केली व क्राईम तसेच प्रलंबित गुन्हे संदर्भाने सूचना दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस उपधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, शेख खुद्दुस, अफसर पठाण, यशवंत गूरूपवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, दिलीप नाईक, शाहेद सय्यद, इमरानुद्दीन सिद्दिकी, रमेश मस्के, माधव सूर्यवंशी, विलास पाईकराव सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.