वाही जवळील कृषी नाक्यावरील घटना
पवनी (Speeding Bike Accident) : पवनी-निलज रस्त्यावरील वाही कॉलनीजवळील कृषी नाक्यावर रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून चालक कागदपत्रे दाखविण्यासाठी नाक्यात गेला. त्यादरम्यान मागेहून भरधाव जाणारी मोटारसायकल उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला अन्य एकजण जखमी झाला. सदर (Speeding Bike Accident) अपघात दि.२५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडला. राहुल प्रमोद गजबे (२१) असे मृतकाचे तर ऋषभ केदार लिंगायत (२६) दोघेही रा. रामटेके नगर, नागपूर असे जखमीचे नाव आहे.
ट्रक क्र. एम.एच.४०/बी.एल.६०१९ चा चालक जितेंद्र चौधरी याने दि.२५ जुलै रोजी पहेला येथील एका राईस मीलमधून तांदूळ भरून पवनीमार्गे तळोधी बालापूर येथे जाण्यास निघाला. निलज मार्गावरील वाही कॉलनी जवळील कृषी नाक्यावर रस्त्याच्या बाजुला ट्रक उभा ठेवून ट्रकचालक कागदपत्रे तपासण्यासाठी नाक्यात गेला. तेव्हा (Speeding Bike Accident) चालकाने ट्रकचे इंडिकेटर सुरू ठेवले होते. त्यादरम्यान पवनीकडून निलजकडे भरधाव जाणारी मोटारसायकल क्र.एम.एच.४९/बी.एस.६४९४ च्या चालकाने मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून उभ्या ट्रकला मागेहून धडक दिली.
त्यात दुचाकीचालक राहुल गजबे (२१) हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावला. तर मागे बसलेला ऋषभ लिंगायत (२६) जखमी झाला. माहिती मिळताच पवनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले. (Speeding Bike Accident) घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात पो.उपनि.प्रितम येवले करीत आहेत.