प्राथमिक, माध्यमिक व सांस्कृतिक विभागात दबदबा
सांस्कृतिक कार्यक्रमात धामणगाव तर निदर्शनेमध्ये तिवसा पंचायत समिती अव्वल
अमरावती (Sports and Cultural Festival) : जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी पंचायत समितीने (Dharani Panchayat Samiti) आपली परंपरा कायम राखली. प्राथमिक, माध्यमिकसह जनरल चॅम्पियनचा मान धारणी पंचायत समितीला मिळाला. तर, सांस्कृतिक कार्यक्रमात धामणगाव रेल्वे तर निदर्शनामध्ये तिवसा पंचायत समिती अव्वल ठरली.
श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयाच्या प्रांगणात तीन दिवसीय जिल्हा स्तरीय शालेय (Sports and Cultural Festival) क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा आज (दि. १६) समारोप झाला. तर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावतीतर्फे या शालेय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांच्या हस्ते झाला.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे हे होते. व्यासपिठावर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर, अनिल कोल्हे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने अमरावतीचे धनंजय वानखडे, भातकुलीचे दीपक कोकतरे,चांदूर बाजारचे गटशिक्षणाधिकारी वकार अहमद, चिखलदराचे रामेश्वर माळवे, तिवसाचे डॉ. नितीन उंडे, चांदुर रेल्वेचे संदीप बोडखे,नांदगाव खंडेश्वरच्या कल्पना ठाकरे, वरूडचे विनोद गाढे, अंजनगावचे श्री. भ. गीरासे, मोर्शीचे गुणवंत वरघट, दर्यापूरचर संतोष घुगे, धामणगाव रेल्वेच्या सपना भोगावकर, धारणीचे सुनील खडे, अचलपूर येथील राम चौधरी, क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर मोहने, संगीता सोनोने, मोहम्मद अशफाक व आदी उपस्थित होते. या (Sports and Cultural Festival) कार्यक्रमाचे प्रास्तविक क्रीडा संयोजक व शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर यांनी केले. तर संचालन सुनीता लहाने, अजय अडिकने व मनीष काळे यांनी केले.आभार उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी मानले.
प्राथमिक विभागात कबड्डी मुले मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव शाळा विजयी ठरली तर (Dharani Panchayat Samiti) धाऱणी तालुक्यातील उकुपाटी शाळा उपविजयी झाली. कबड्डी मुलीमध्ये उकुपाटी, धारणी विजयी झाली तर चिखलदरा तालुक्यातील आडनद शाळा उपविजयी झाली. लंगडी मध्ये चिखलदरा तालुक्यातील केली शाळा विजयी तर धारणी तालुक्यातील खाऱ्या शाळा उपविजयी ठरली.
तसेच माध्यमिक विभागात कबड्डी मुले- खेळ प्रकारात धारणी तालुक्यातील उकूपाटी शाळा विजयी व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड उर्दू शाळा उपविजयी ठरली.कबड्डी मुली मध्ये धारणी तालुक्यातील चिपोली शाळा विजयी तर धामणगाव तालुक्यातील बोरगाव निस्ताने शाळा उपविजयी झाली.खो खो मुले खेळ प्रकारात धारणी तालुक्यातील मांसुधावडी शाळा विजयी झाली तर अमरावती तालुक्यातील पिंपळखुटा शाळा उपविजयी ठरली. हॉलीबॉल मुले मध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील जावरा शाळा विजयी आणि दर्यापूर तालुक्यातील दारापुर उर्दू शाळा उपविजयी झाली.
हॉलीबॉल मुली मध्ये चटवाबोड,धारणी विजयी आणि भातकुली उर्दू शाळा उपविजयी झाली. टेनिक्वाईट दुहेरी मुली मध्ये चांदूर बाजार तालुक्यातील सैफिनगर उर्दू शाळा विजयी तर धारणी तालुक्यातील चटवाबोड उपविजयी झाले. बॅडमिंटन मुले दुहेरी मध्ये तिवसा तालुक्यातील जावरा शाळा विजयी व मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर उर्दू शाळा उपविजयी ठरली.
सांस्कृतिक कार्यक्रमात (Sports and Cultural Festival) प्रथम क्रमांक धामणगाव रेल्वे पंचायत समितीने प्राप्त केले. तर द्वितीय क्रमांक अमरावती पंचायत समितीने (Amravati Panchayat Samiti) पटकाविला. निदर्शने मध्ये (Tivasa Panchayat Samiti) तिवसा पंचायत समिती प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक अमरावती पंचायत समितीने प्राप्त केला.
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या (Sports and Cultural Festival) यशस्वीतेसाठी सर्व नियोजन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,साधनव्यक्ती,विशेष शिक्षक यांनी कर्तव्य बजावले. असे प्रसिद्धी समितीचे प्रमुख विनोद गाढे, उपाध्यक्ष विनायक लकडे, शकील अहमद,राजेश सावरकर,श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी (Sports and Cultural Festival) सतिश नांदने, मनोज खोडके, दिनेश देशमुख,पंकज देशमुख,मनोज चौरपगार,राजु खिराडे,राजेश नाईक,मंगेश खेरडे,प्रशांत पवार,धनराज कुंजेकर,भुषण बागडे,डॉ. आशिष पांडे,किसन राणे, हेमंत यावले, मनिष काळे, सचिन वावरकर, चंदू रामटेके, उज्वल पंचवटे, कैलास कावनपुरे, श्रीधर बालपांडे, सरफराज खान, संजय कोकाटे, सतीश टाले, विकास भडांगे, सूरज मंडे, शैलेंद्र दहातोंडे, गजानन मोरे, राजेंद्र झाकर्डे, प्रवीण जावरकर, राजेंद्र दिक्षित आदींनी विशेष कर्तव्य बजावले.
मेळघाटच्या मोनिकाचा सन्मान
मेळघाटमधील धारणी तालुक्यातील उकुपाटी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मोनिका मनसाराम मोरेकर हीची (Sports and Cultural Festival) राज्य स्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी नामांकन झाले आहे. मार्गदर्शक शिक्षक महादेव राठोड,जयराम धूर्वे,राजेश वानखडे, मिठाराम कस्तुरे,रवींद्र मालवीय व आदी आहेत. या यशाबद्दल मोनिकाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांनी सत्कार केला.