Neeru Dhanda

इतिहास घडला! नीरू ढांडा एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

नीरू ढांडाने एशियन गेम्स 2026 मध्ये महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. २८ गुणांसह तिने आशियाई विक्रमही मोडला.

इतिहास घडला! नीरू ढांडा एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

२८ गुणांसह नीरू ढांडा ठरली आशियाई स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक ट्रॅपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला शूटर

एशियन गेम्स 2026 मध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी नेमबाजीमध्ये नीरू ढांडाने महिलांच्या इंडिव्हिज्युअल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकणारी नीरू ही पहिली भारतीय महिला शूटर ठरली. तिच्या कामगिरीमुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

नीरूने स्पर्धेच्या पात्रता फेरीतच आपली ताकद दाखवून दिली होती. तिने १२५ पैकी ११८ हिट्सची नोंद करत अव्वल स्थान मिळवले आणि आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिच्या ११८ गुणांच्या कामगिरीने एशियन गेम्समधील पात्रता फेरीतील विक्रमाची बरोबरी केली.

अंतिम फेरीत नीरूने सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत २८ गुण मिळवले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चीनची सन युनोंग २६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर कुवेतच्या हजर अब्दुलमलिकने २१ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. नीरूच्या २८ गुणांच्या कामगिरीने यापूर्वीचा २४ गुणांचा आशियाई विक्रमही मागे पडला.

या स्पर्धेत भारताच्या आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनीही सहभाग घेतला होता. मात्र, दोघींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. आशिमा १६व्या, तर मनीषा २३व्या क्रमांकावर राहिल्या.

नीरूच्या या सुवर्णपदकाआधीही भारताच्या ट्रॅप संघाने चमकदार कामगिरी केली होती. नीरू ढांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या भारतीय संघाने महिलांच्या ट्रॅप टीम इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले. भारतीय संघाने एकूण ३२८ गुणांची नोंद केली. चीनने ३४६ गुणांसह सुवर्णपदक, तर कुवेतने ३२५ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

नीरू ढांडासाठी २०२६ हे वर्ष विशेष ठरले आहे. इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्डकपमध्ये तिने महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. वर्ल्डकपमध्ये महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

एशियन गेम्समधील नीरूच्या सुवर्णकामगिरीमुळे भारतीय महिला नेमबाजीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचे पान जोडले गेले आहे. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रणधीर सिंह यांनी १९७८च्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर रोंजन सोढी यांनी २०१०च्या एशियन गेम्समध्ये डबल ट्रॅप प्रकारात भारताला वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता नीरू ढांडाने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकत या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

संबंधित सामग्री

मुंबईत भरदिवसा गोळीबाराने खळबळ! कुर्ल्यात तरुणावर तीन गोळ्या झाडल्या

मुंबईत भरदिवसा गोळीबाराने खळबळ! कुर्ल्यात तरुणावर तीन गोळ्या झाडल्या

मुंबईच्या कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार! हलाव पुलाजवळ विनोद पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. प्रकृती गंभीर; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
आधी कुटुंबाची हत्या, नंतर शहरात गोळीबार? पोलंडमधील घटनेने युरोप हादरले

आधी कुटुंबाची हत्या, नंतर शहरात गोळीबार? पोलंडमधील घटनेने युरोप हादरले

पोलंडच्या क्राकोव्ह शहरात गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी. हल्लेखोराच्या घरात आई-वडील आणि बहिणीचे मृतदेह आढळल्याने खळबळ.

Nov 09, 2026
अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली? KBC चं शूटिंग आठवडाभरासाठी थांबवलं; चाहत्यांची चिंता वाढली

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली? KBC चं शूटिंग आठवडाभरासाठी थांबवलं; चाहत्यांची चिंता वाढली

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे KBC च्या शूटिंगला आठवडाभराचा ब्रेक? दिवाळी विशेष भागांचं प्रसारण सुरू.

Nov 07, 2026
बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार? टायगर श्रॉफ प्रकरणात नवा दावा

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार? टायगर श्रॉफ प्रकरणात नवा दावा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शूटर फूल सिंह आणि रेहानचा कथित दावा. हत्येचा हेतू नसल्याचे सांगितल्याचे वृत्त; मुंबई क्राइम ब्रँचकडून तपास सुरू.

Oct 29, 2026
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवे वळण; हल्लेखोरांचे पहिले लक्ष्य आमिर खान होता का?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवे वळण; हल्लेखोरांचे पहिले लक्ष्य आमिर खान होता का?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आमिर खान लक्ष्य असल्याचा तपास यंत्रणांना संशय; घराजवळ रेकी आणि कथित धमक्यांची चौकशी सुरू.

Oct 26, 2026