हिंगोली (Red Soil Wrestling Centre) : लाल माती कुस्ती केंद्रातील १८ मल्लांची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच केंद्रातील दोन मल्लांची विदर्भ संघातून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुस्ती स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या मल्लांची पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विभागीय स्पर्धेत निवड झालेले १८ मल्ल तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विदर्भ संघात स्थान मिळवलेल्या दोन मल्लांकडून पुढील स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लाल माती कुस्ती केंद्रातील (Red Soil Wrestling Centre) मल्लांना वस्ताद शेख नफीस पहेलवान (विदर्भ केसरी, खेलो इंडिया प्रशिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. नियमित सराव आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून मल्ल स्पर्धांसाठी तयारी करीत आहेत. या निवडीबद्दल केंद्राच्या वतीने सर्व मल्लांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
-वस्ताद शेख नफीस पहेलवान, विदर्भ केसरी, खेलो इंडिया प्रशिक्षक