हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
हिंगोली (SRF Colony Burglary) : राज्य राखीव बल गट क्र.१२ मध्ये अधिकारी व कर्मचार्यांची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी आतमध्ये जाणार्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशव्दारावर संपूर्ण चौकशी केल्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडले जाते. अशा (SRF Colony Burglary) कडक सुरक्षेमध्ये देखील राज्य राखीव दल वसाहतीमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडून २ लाख २५ हजार ८९४ रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरट्यांनी दोन निवासस्थानी चोरी करून पळविला सव्वा दोन लाख रुपयाचा ऐवज रोकड
राज्य राखीव पोलिस बल वसाहती (SRF Colony Burglary) मधील मनिषा बालाजी मडके यांची आई आजारी असल्याने त्या कुटूंबासह भेटण्याकरीता बाहेरगावी गेल्या होत्या. याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे कुटूंबीय देखील विवाह सोहळ्याकरीता बाहेरगावी गेले होते. दोन्ही घरांना कुलूप असल्याचे संधी चोरट्यांनी साधून आतमध्ये प्रवेश करून दोन्ही घरातील कपाट फोडून १५ हजाराच्या रोख रक्कमेसह ३८.९ ग्रॅम सोन्याचे व ९.२ तोळे चांदिचे दागिणे असा एकुण २ लाख २५ हजार ८९४ रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
१७ जुलैला मडके कुटूंबीय बाहेरगावून आल्यावर त्यानंतर घराचे तुटलेले कुलूप दिसून येताच चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती हिंगोली शहर पोलिसांना दिल्याने पोलिस निरीक्षक संदिप मोदे, सपोनि संगमनाथ परगेवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते. या (SRF Colony Burglary) प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.




