Manora :- मानोरा तालुक्यात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंग, उडीद तर हातचे गेले सध्या उभ्या असलेल्या सोयाबीन पिकांच्या शेतात नाही मोडके फोटो लागले आहे, तर कापूस(Cotton) उमळून वाळून जात असल्याने बळीराजांची परवड थांबता थांबत नसून कसाही झालेल्या व नुसता घोषणेचा पाऊस पाडणाऱ्या मायबाप सरकारकडून अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कापूस उमळला, बळीराजाची परवड थांबता थांबेना !
मामरा तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण पिके पाण्याखाली आली आहेत. तर एक वेळा नव्हे तर तीन वेळा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले उडीद, मुंग पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. आता सोयाबीन परिपक्व अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे हिरव्या शेंगांनाच कोम फुटत असल्याने बळीराजा पुरता हतबल झालेला आहे. तसेच पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे अवस्था अति पावसामुळे(Rain) त्याच प्रकारची झाली आहे. सध्या कापूस हे ती पूर्णपणे उन्मळून जाऊन कापसाची झाडे वाळत चालली असल्याने बळीराजा हतबल झालेला पाहावयास मिळत आहे. आधीच हुमणी अळी, विविध किडींचा प्रादुर्भाव व अमरवेल यामुळे काही भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत पडली आहे.
त्यामुळे महागडी फवारणी करू नये शेतामधील सोयाबीन पिक हातातून गेले आहे. खरीप हंगामात पेरणीला रासायनिक खते, बी बियाणे व इतर शेती खर्चामुळे आता पुरते शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी पण शासनाकडून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्यात येत आहे.