यवतमाळ (CM Devendra Fadnavis) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज यवतमाळ येथे एकूण ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ समता मैदान येथे आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्व प्रथम शेतकर्यांच्या विषयाला होत घातला. ते म्हणाले की जून महिन्यात वरुण राजाची कृपा झाला मात्र त्यानंतरच्या काळामध्ये निसर्गाची कृपा जास्त झाल्यामुळे पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. पिकांचे नुकसान झाले,घरांची पडझड झाली,जनावरे वाहून गेले आहेत. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्यांना राज्य सरकार पूर्णपणे मदत करणार असल्याचे राज्याचे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके, खा.संजय देशमुख, आ. राजू तोडसाम, आ. किसनराव वानखेडे, आ.सईताई डहाके, आ.संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरु आहेत,पंचनाम्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकर्यांना मदत केली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.सरकार प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता,प्रत्येक घरापर्यंत पाणी,शिक्षणाच्या सुविधांसाठी वस्तीगृहाची उभारणी करीत आहे. आज जवळपास १७ विभागांना एकत्रित करून सगळ्या योजना योग्य पद्धतीनं आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज या आपल्या आदी कर्मयोगी या योजनेमध्ये २३ जिल्ह्यातल्या १९३ तालुक्यांमध्ये आपण जवळपास ५००० गावात अभियान राबविल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास ३६६ गावांची निवड यांच्यामध्ये करण्यात आली आहे आणि या माध्यमातून राज्यात आदिवासी समाजामध्ये २० लाख तरुणांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना समाजाचं नेतृत्व देणं त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवणं अशा प्रकारचं काम आज या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा दत्तक घ्यावा : ना.अशोक उईके
देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची सत्ता आपल्यापासून देशात प्रथम आदिवासींच्या विकासाकडे लक्ष दिल्या गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आदिवासी विभागाची मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यामुळे,मला माझ्या समाजाच्या कल्याणासाठी काही तरी करता आले. आदिवासी समाजाचे अधिक कल्याण होण्यासाठी,यवतमाळ जिल्ह्यातील जनतेपर्यंत विकास पोहचविण्याकरीता मुख्यमंत्र्यांनी जिल्हाच पालकत्व घ्याव किंवा जिल्हा दत्तक घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांनी केले.
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची पायाभरणी : ना.संजय राठोड
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या व्यापक दृष्टीमुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे.विकासाचे झंझावत राज्यात सुरु असून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदी कर्मयोगी उपयुक्त ठरेल. आदिवासी समाज हा मुळ निवासी असून यापुर्वी त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास हा आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविल्या जात आहे. आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके हे आपल्या जिल्ह्याचे असल्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला आनंद असल्याचेही ना.संजय राठोड म्हणाले.
३५ मेगावॅट क्षमता असलेल्या अकरा सौर प्रकल्पाचे लोकार्पण
यवतमाळ येथे विविध विकास कामांचे लोकार्पण,भूमिपूजन आणि शुभारंभ कार्यक्रमात महावितरणच्या सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या आणि ३५ मेगावॅट क्षमता असलेल्या जिल्ह्यातील ११ सौर प्रकल्पाचे लोकार्पण (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. शेतकर्यांच्या विकासासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत असून शेतकर्यांना शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मागेल त्याला सौर कृषीपंप ,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्यात येत असून डिसेबंर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १०० टक्के शेतकर्य़ांना दिवसा १२ तास आणि मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य : मुख्यमंत्री फडणवीस
आज यवतमाळ शहरामध्ये आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वात (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन बापूंचे आशिर्वाद घेतले. मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत, मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.