रिसोड (Teacher Award) : येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कलाध्यापक विठ्ठल सरनाईक व रिसोड तालुक्यातील स्व.नरसिंगराव नथ्थुजी बोडके विद्यालय धोडप येथील कलाशिक्षक अनंत बोडखे यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार जाहिर झाला असून या पुरस्काराचे वितरण नंदुरबार जिल्हयातील शहादा येथे ११ व १२ जानेवारी रोजी होणार आहे. याबद्दल सरनाईक व बोडखे यांचे वाशिम जिल्हयातून सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.
कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे यांच्या वतीने कला शिक्षण परिषद २०२५ चे कला शिक्षण परिषदेचे आयोजन नंदुरबार जिल्हयातील शहादा येथे दि. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार असून तेथे हा (Teacher Award) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयातून दोन कलाशिक्षकांना यावेळी आदर्श कला शिक्षक हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे.
कला शिक्षणपरिषदेचे नंदुरबार जिल्हयातील शहादा येथे ११ व १२ जानेवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या (Teacher Award) कला शिक्षण परिषदेत तज्ञ चित्रकारांचे मार्गदर्शन, विविध कला प्रात्यक्षिक, कला शिक्षकांचे विविध प्रश्न, शासकीय रेखा कला परीक्षा विषयक सर्व बाबी तसेच कला विषयक विविध स्पर्धा व मनोरंजन आणि कला क्षेत्रातील विकासावर आधारीत चर्चासत्र तसेच राज्य कला शिक्षक परिषदेचे संघटनात्मक कार्य यावर या शिक्षण परिषदेत मार्गदर्शन होणार आहे. तसेच राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार सरनाईक व बोडखे यांना मा. ना. दादाजी भुसे, शिक्षणमंत्री यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्हयातील जास्तीत जास्त कला शिक्षकांनी या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेला उपस्थित राहून शासनाच्या नवीन कौशल्य अधिष्ठीत कलागुणांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी सहकार्य करावे. (Teacher Award) शिक्षकांनी राज्य संघटन बळकट व मजबूत करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य प्रसिध्दी प्रमुख शिवाजी नीलकंठे व जिल्हा सचिव चंदनशिव यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.