व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेची आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे मागणी!
लातूर (Statue Of Knowledge) : लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (Dr. Babasaheb Ambedkar Park) येथे प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटाच्या भव्य पुतळा उभारणीच्या कामासाठी असलेली प्रशासकीय मान्यता तातडीने प्रदान करावी, तसेच या कामासाठी लागणारा अतिरिक्त 12 कोटी रूपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे व्ही.एस. पँथर्स युवा संघटनेच्यावतीने (Panthers Youth Organization) युवानेते विनोद खटके यांनी केली आहे.
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा प्रस्ताव सादर!
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फूटाचा भव्य पुतळा “स्टॅच्यू ऑफ नॉलेज” उभा करण्यास यापूर्वीच शासनाने 10 कोटी रूपये मंजुरी दिलेली आहे. मात्र अनेक महिने होवून सुध्दा याबाबत प्रशासन स्तरावर कांहीच कार्यवाही होत नाही. लातूर मनपा आयुक्त (Latur Municipal Commissioner) यांनी या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी च्या कामाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली नाही, ही बाब अतिशय वेदनादायी आहे.
तमाम आंबेडकरी समुदायाची आग्रही मागणी!
तसेच या कामासाठी लागणाऱ्या उर्वरित निधी मागणीचा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे सादर करण्यात आला नाही. सदरचा पुतळा तातडीने उभारला पाहिजे, या साठी तमाम आंबेडकरी समुदायाची आग्रही मागणी आहे. परंतु, या कामासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची भावना निर्माण होत आहे. तरी तातडीने प्रशासकीय मान्यता प्रदान करावी तसेच पुतळा उभारणी कामासाठी लागणारा उर्वरित 12 कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने शासनाला (Government) सादर करावा. अन्यथा याप्रकरणी नाविलाजाने जन आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा दिला आहे. या शिष्टमंडळात डॉ.सिद्धार्थ सूर्यवंशी, संपर्कप्रमुख आनंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष शरद किनीकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. किरण पायळ, संपर्क प्रमुख आनंद जाधव यांचा सहभाग होता.