हिंगोली (Diwali Silver Prices) : सोन्यासोबत चांदीचा भाव यंदा सुसाट वेगाने वाढला असून पुढेही ही स्पीड कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या चांदीच्या किमती झपाट्याने वाढत आहेत भविष्यात सोन्यापेक्षा चांदी अधिक पसंतीची बनू शकते असे चित्र दिसत आहे. दरम्यान १५ ऑक्टोबर बुधवार रोजी चांदीचा १ किलोचा भाव १ लाख ८८ हजार रुपये होता. मंगळवारापेक्षा भावात ७ हजाराची घसरण झाली.
सोन्यापेक्षा यंदा चांदीच्या दराने भाव खाल्ला आहे. सणासुदीच्या तोंडावर सोन्यासोबत (Diwali Silver Prices) चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या-बाहेर गेली असून चांदीचा भाव पुन्हा एकदा गगनाला भिडला आहे. आतापर्यंत शेअर बाजार आणि सोन्यापेक्षाही चांदीने आधीच जास्त परतावा दिला आहे.
मागील काही दिवसापासून चांदी सतत वाढत आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा दर १ लाख ९५ हजार रुपये होता.बुधवारी तो १ लाख ८८ हजार रुपये चांदी सातत्याने वाढत आहे. (Diwali Silver Prices) दिवाळीपूर्वीच चांदीच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. चांदीच्या दरात वाढ होण्याच्या कारणात औद्योगिक क्षेत्रात वाढती मागणी आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सौर, पँनल तसेच वैद्यकीय उपकरणासाठी देखील चांदीची मागणी वाढत आहे. पुरवठा व मागणी यातील तफावत यामुळे चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.
दरम्यान दिवाळीच्या सणात अनेक जण चांदी खरेदीला महत्त्व देतात. तर काही जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. लक्ष्मी पुजनाला त्याचे विशेष महत्त्व असते. मात्र त्याचा वाढता दर पाहता खरेदी आवाक्या बाहेर जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वी एक लाखाच्या आत चांदीचा दर असताना खरेदी करणार्यांची आता मात्र, (Diwali Silver Prices) चांदी झाली असल्याचे चित्र आहे.