लहान मुलांसह महिलाही जखमी
वसमत (Street Dogs Bitten Case) : वसमत मध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये अनेक कुत्रे पिसाळलेले आणि रोकडे आहेत नागरिकांचा चावा घेत आहेत. गेल्या दोन दिवसात पंधरा हजारांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यात लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर लागणारे इंजेक्शन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांनीकेले आहेत.
वसमत शहरात विविध भागात (Street Dogs Bitten Case) कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. उघड्यावर मांस विक्री दुकाने मोठ्या संख्येने वाढले आहेत त्यामुळे त्या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे उघडा वरील मास विक्री बंद केली तर, कुत्र्यांच्या संख्येवर आळा बसू शकतो. मात्र त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासन पाहत नसल्याने उघड्यावर मास विक्री करणारी दुकाने वाढत आहेत.
नागरिकारांवरही कुत्रे हल्ले करत आहेत परभणी रोडवरील दादऱ्याजवळ, जवाहर कॉलनी, मामा चौक मटन मार्केट, शुक्रवार पेठ, गडी मोहल्ला शहर पेठ, कबूतरखाना, खाजीपुरा, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, बँक कॉलनी यासह शहराच्या सर्वच भागात कुत्र्यांचा उपद्र वाढला आहे.
गेल्या दोन दिवसापासून तब्बल दहा ते पंधरा जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. हे आता लहान मुलांचा व महिलांचा नागरिकांचा समावेश आहे. कारखाना रोडवरील जवाहर कॉलनी रस्त्यावर शेख रफिक व अलिझा या एकाच कुटुंबातील दोघांना (Street Dogs Bitten Case) कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता तेथे लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ रुग्णावर आल्याची तक्रार आहे. शहरात वाढलेल्या कुत्र्याची संख्या व नागरिकांवर होणारे हल्ले पाहता नगरपालिका प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
लस उपलब्ध करावी
या संदर्भात बोलताना वसमतचे माजी नगरसेवक शेख जानी मिया यांनी शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून, नगरपालिका प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा कुत्रे चावत आहेत. मात्र उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची त्यांनी तक्रार केली. त्यांच्या त्यांच्या मुलाला व नातवाला एकाच वेळी कुत्र्याने चावून जखमी केले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात गेले असता त्यांना मिळाली नाही. त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागले, असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात कुत्र्याची लस भरपूर प्रमाणात कायम ठेवावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.