परभणी/गंगाखेड (Parbhani) :- दिव्यांग मुला, मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तुळजा भवानी मुकबधीर निवासी विद्यालयाच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात ९ मार्च रोजी पार पडलेल्या दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गंगाखेड शहरातील तुळजा भवानी मुकबधीर निवासी विद्यालयातील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा (Sports)प्रकारात उत्फूर्तपणे सहभाग नोंदवत १२ ते १६ वर्ष वयोगटाच्या गोळाफेक स्पर्धेत कु. चांदणी राम ब्रिंगणे हिने व १०० मीटर धावणे या स्पर्धेत कु. योगिता वैजनाथ कुंडगीर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गणेश लाड, कु. अश्विनी मुळे, सना सय्यद, लक्ष्मण सोळंके, अब्दुल्ला सय्यद या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. याच प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात (Cultural events) ही शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अशोकराव मुंढे, सचिव राजेंद मुंढे, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Parbhani : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कर्णबधीर विद्यार्थ्यांचे यश
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics