हिंगोली (Independence Day) : स्वातंत्र्य दिन एका दिवसावर.येवून ठेपल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध शाळेत बँड, लेझीम पथकासह छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी सुरू केली असून सकाळी दररोज शाळेत रंगीत तालीम १३ आँगस्ट बुधवारी घेण्यात आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी या कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता, तसेच ध्वजस्तंभाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने देखील हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने तिरंगा रँली देखील काढण्यात येत आहे. यामध्ये शासकीय कार्यालयासह शाळा, महाविद्यालय देखील सहभागी झाले आहेत.
तसेच शाळा, महाविद्यालयात देखील स्वातंत्र्य दिनाची (Independence Day) तयारी सुरू केली आहे. शाळेतील छात्र सैनिक, स्काऊट गाईड, लेझीम पथक, बँड पथकाने संचलनात आपण मागे पडणार नाही यासाठी मागील काही दिवसापासून शाळेच्या प्रांगणात त्याची तयारी केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतून काढण्यात येणार्या प्रभातफेरी मध्ये बँड पथक समोर असणार आहे. तसेच ध्वज वंदनानंतर होणारे राष्ट्रगीत देखील बँड पथक सादर करणार आहे. तसेच छात्रसैनिक संचालन करणार आहे. तर लेझीम पथक प्रात्यक्षिक सादर करणार आहे.
यामुळे शाळेतील विविध पथकाने स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी केली आहे. शाळेतील या विविध पथकाला मार्गदर्शक शिक्षक मागील काही दिवसापासून मार्गदर्शन करत आहेत. बुधवार शाळेतील या पथकाची रंगीत तालीम देखील घेण्यात आली. आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हि पथके प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहेत. दोन दिवसापासून विविध शाळेच्या प्रागंणात या पथकातील सहभागी विद्यार्थी तयारीत मग्न असल्याचे चित्र आहे.




 
			 
		

