वसमत (Sugar Factory) : पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ चा “गव्हाण पुजन समारंभ” ३१ आक्टोंबर रोजी पार पडला यावेळी ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या 45 व्या गव्हाण पूजन कार्यक्रमासाठी कारखान्याचे शेती व ऊसविकास उपसमिती अध्यक्ष शहाजी देसाई यादोजी शेळके, बबनराव माणिका बेंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन कार्यक्रम संपन्न झाला विधिवत पूजा करून उसाची मोळी टाकण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजाननराव धवन यांनी तर आभार अमोल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी संचालक सभासद शेतकरी वाहतूक ठेकेदार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
