Parbhani :- परभणीतील सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेंटी वन युनिट २ साखर कारखाना (sugar factory) प्रशासनाने गतवर्षी गळीत हंगामातील शेतकर्यांना बिल २ हजार ५०० रूपये प्रति टन ऊसाचा पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र उर्वरित फरकाची रक्कम ही कारखाना प्रशासनाने दिली नसून बाकी असलेली रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी अशी मागणी सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे संचालक रामेश्वर मोकाशे यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. रक्कम लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तहसीलदारांना रामेश्वर मोकाशे यांचे निवेदन फरकाच्या रक्कमेसाठी लवकर आंदोलन..!
सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, उखळी, शिर्शी, वडगाव, विटा, लासीना, दुधगाव, वाणीसंगम, गंगापिंपरी, थडीउक्कडगाव, वाडीपिंपळगाव, थंडीपिंपळगाव, वाणीसंगम यासह संपूर्ण तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस (Sugar cane) गत वर्षी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकर्याने कारख्यान्याला गेला होता.ऊसाचा भाव हा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार देण्याची गरज आहे. परंतु ऊसाचे बिल २ हजार ५०० रूपये प्रमाणे दिले आहे. त्यावेळी विचारणा केली असता त्यांवर कारखाना प्रशासनाच्या आम्ही दुसरा हप्ता देऊ असे तोंडी सांगितले होते.परंतु सोनपेठ तालुक्यातील शेतकर्यांना अद्याप पर्यंत कारखान्याने एफआरपी नुसार दुसरा हप्ता शेतकर्यांना दिलेला नाही.त्यामुळे शेकडो शेतकरी यांपासून वंचित राहिले जात आहेत.सोनपेठ तालुक्यातील व परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस हा कारखान्याला देण्यात आला आहे. परंतु कारखाना प्रशासनाने तातडीने थकीत फरकाची रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी, अशी मागणी सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्वर मोकाशे यांनी केली आहे.