८६.५० लाख क्विंटल उत्पादन
लातूर (Sugar season) : प्रादेशिक साखर सहसंचालक विभागातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात असून, २४ फेब्रुवारी अखेर ९० लाख ७८ हजार ५६६ मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. ८६ लाख ४२ हजार ७५८ किंटल साखरेचे उत्पादन (Sugar season) झाल्याचे ताज्या क्रशिंग रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत मराठवाड्यातील परभणी ७,हिंगोली ५, नांदेड ६, आणि लातूर ११ या ४ जिल्ह्यांतील खाजगी १९, सहकारी १० अशा एकूण २९ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी एकट्या लातूर जिल्ह्यात ११ कारखान्यांकडून उसाचे गाळप केले जात आहे.
विभागातील ७ कारखान्यांचे गाळप थांबले
नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, या चार जिल्ह्यातील एकूण २९ कारखान्यांनी अद्यापपर्यंत ९० लाख ७८ हजार ५६६ मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. सध्या गाळप हंगाम (Sugar season) अंतिम टप्प्यात असून, परभणी जिल्ह्य़ातील १आणि लातूर जिल्ह्यातील ६ या कारखान्याने गाळप थांबविल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
नोव्हेंबरपासून हंगाम सुरू
यंदा सर्वच कारखान्यांचे १५ नोव्हेंबर २०२४ पासून गाळप (Sugar season) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागातील काही कारखाने पहिल्या टप्प्यात सुरू झाले. सध्या सुरू असलेल्या कारखान्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ अखेर गाळप केलेल्या उसापासून ८६ लाख ४२ हजार ७५८क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाली.
२२ कारखान्यांकडून सध्या गाळप सुरू
विभागांर्तगत प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील परभणी , हिंगोली, नांदेड, लातूर, हे जिल्हे येतात. यंदाच्या (Sugar season) गाळप हंगामासाठी प्रादेशिक कार्यालयाने २९ कारखान्यांना गाळप परवाना दिलेला आहे. २४ फेब्रुवारी अखेर परभणी १, आणि लातूर ६, कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. तर उर्वरित २२ कारखान्यांचे सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे.