परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील घटना!
परभणी (Suicide Case) : परभणीतील बोरी घर बांधण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये तसेच लग्न झाल्यापासून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय विवाहितेने (Married) गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील वर्णा येथे 2 ऑगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा!
वंदना विष्णू अंभुरे वय 32 वर्ष, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ गोपाळ खिस्ते यांनी बोरी पोलिसात (Bori Police) तक्रार दिली आहे. वंदना हिचे लग्न विष्णू अंभुरे याच्या सोबत सन 2012 मध्ये झाले होते. लग्नानंतर, काही दिवस चांगले नांदविल्यानंतर, सासरच्या मंडळींनी (In-Laws) विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, नवर्याने माहेरुन 1 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत माहेरी पाठविले. त्यानंतर माहेरच्या लोकांनी विवाहितेला समजावून सांगत सासरी वर्णा येथे आणून सोडले. सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने 2 ऑगस्टला दुपारी साडे बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी विष्णू अंभुरे, मुंजाभाऊ अंभुरे, तारामती अंभुरे, ज्ञानेश्वर अंभुरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात (Crime Record) आला आहे. तपास पोउपनि. गायकवाड करत आहेत.