हिंगला येथील घटना ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद!
परभणी (Suicide Case) : काम करायला सांगितल्याने, राग येऊन रागाच्याभरात तरुणीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. ही घटना परभणी तालुक्यातील हिंगला येथे घडली. सदर प्रकरणी 17 मे रोजी परभणी ग्रामीण पोलिसात (Rural Police) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निकिता रनेर वय 20 वर्ष, असे मयत तरुणीचे नाव आहे. याबाबत प्रभाकर अब्दागिरे यांनी खबर दिली आहे. निकिता हिला शेतात काम करण्याचा कंटाळा येत होता. तिला कोणी काम करायला सांगितले, तर राग येत होता. म्हणून तिने रागाच्याभरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी खबर देण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास पोउपनि. गडदे करत आहेत.
घरातील खिडकिला साडीने घेतला गळफास!
परभणी : घरातील खिडकीला साडीने गळफास घेतल्यानंतर, साडीसह खाली पडून बेशुध्द झालेल्या, इसमाला रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. ही घटना 17 मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील खडका येथे घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण यादव यांनी खबर दिली आहे. रामेश्वर ज्ञानोबा यादव वय 48 वर्ष, असे मयताचे नाव आहे. तपास पोह. पवार करत आहेत.



 
			 
		

