Ralegaon :- कळमनेर येथील तरुण युवा शेतकर्याने कर्जबाजारी पणाला व नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात विष प्राशन (poison solution) करून आत्महत्या (suicide)केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
कर्जबाजारी पणाला व नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या
किशोर खुशाल वैरागडे (३२) या युवा तरुण शेतकर्यांचे नाव असून त्यांच्या वडिलांच्या नावाने पाच एकर शेती असून तो आई वडील पत्नी हे सर्व एकत्रित राहत होते. किशोर हा घरची शेती करत होता परंतु मागच्या वर्षी शेतात उत्पादन कमी झाल्याने कर्जाची परतफेड करू शकला नाही. मात्र याही वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिके जेमतेमच असल्याने तो यावर्षी तरी कर्जाची कशी परतफेड करावी या चिंतेत असायचा शेवटी आज सकाळी किशोर वैरागडे यांनी सकाळी स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती राळेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन किशोर यांचा मृतदेह (dead body) राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपासणीचा पोलीस करीत आहे.




