हिंगोली (Cyclothon Competition) : १०५ भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व फिट इंडीया मोहिमे अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलिस व राज्य राखीव बल गट क्रमांक १२ हिंगोली तर्फे सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या (Cyclothon Competition) स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
हिंगोलीतील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर २४ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायकल थॉन स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवुन सुरूवात केली. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. एका गटात प्रविन काळबांडे (प्रथम), संतोष केकन (दृत्तीय) तर निवृत्त सपोउपनि कैलास मिटकर (तृत्तीय) क्रमांक पटकाविले आहे. दुसरा गटात ए. एन. पवार (प्रथम), जे.जी. सावंत (दृत्तीय), बी.पी. महागांवे (तृत्तीय) कमांक पटकाविले आहे.
तर तिसऱ्या गटात हिंगोली जिल्हा पोलीस दलातील पोउपनि मोरे (प्रथम), सपोउपनि एस.पी. सांगळे (द्वितीय), पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे (तृत्तीय) क्रमांक पटकाविले आहे. स्पर्धेस पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अति. पोलीस अधिक्षक कमलेश मिना, पोलिस उपाधिक्षक अंबादास भुसारे, पोलिस उपधिक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उपाधिक्षक दामनवाड (एस. आर. पी. एफ गट नं १२), पो.नि केंद्रे, पो. नि शरद मरे, पो. नि संदीप मोदे, पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि मोरे राखीव पोलीस उप निरीक्षक बी. एच. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायकल थॉन स्पर्धेचे (Cyclothon Competition) आयोजन शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे पोउपनि घुमनर, सपोउपनि शेषराव राठोड, गजानन राठोड, संतोष घुगे, नंदकिशोर महाजन, संभाजी मोरे, विलास सिनगारे, संजय चव्हाण, कपिल जाधव, चंद्रशेखर देशमुख, शशिकांत भिसे, गजानन दांडेकर, मिरा सोनपावले, शिल्पा फटाले यांनी केला आहे.