परभणी पोलीस अधीक्षकांचे आदेश!
परभणी (Superintendent of Police) : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये बकरी ईद संबंधाने दाखल गुन्ह्यातील आरोपींविरुध्द, कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 77 आरोपींना 6 जून ते 8 जून या कालावधीत हद्दपार करण्यात आले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा (Indian Civil Security) संहितेच्या कलम 163 अन्वये संबंधितांना त्या-त्या क्षेत्रातून हद्दपार (Deportation) करण्यात आले आहे.
बकरी ईदच्या अनुषंगाने कारवाई!
मागील काही वर्षातील बकरी ईद व गोवंश तस्करी, कत्तली संबंधाने जिल्ह्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीतांकडून (Accusations) बेकायदेशीर कृत्य घडले आहे. त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झालेली नाही. संबंधितांकडून आगामी काळात सण उत्सवा दरम्यान गैर कायदेशीर कृत्य (Unlawful Act) होऊन एखादा गंभीर गुन्हा (Serious Crime) घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता, अशा व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी (Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi) यांनी आदेश दिले होते. त्यावरुन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी!
बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सर्व सिमेवर तपासणी पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर नाकाबंदी करण्यात येत आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी जनावरांच्या अवैध वाहतुकी संदर्भाने तपासणी करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सोशल मिडियावर देखील लक्ष ठेवण्यात आले आहे. समाज माध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण होईल, असे मजकुर, चित्र, व्हिडिओ प्रसारित करु नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.