कन्हान (Swachh Bharat Abhiyan) : नगर पंचायत कांद्री (कन्हान) क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान मुख्याधिकारी सचिन गाढवे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. सोमवार मार्चला नगरपचायत कांद्री येथे (Swachh Bharat Abhiyan) स्वच्छ भारत अभियानांतर्गत झेंडा चौक वॉर्ड क्र. २ व संपुर्ण कांद्री नगरपंचायत क्षेत्रात ओला कचरा, सुखा कचरा वेगळा वेगळा करणे, शहरात स्वच्छता ठेवणे, प्लास्टिक मुक्त शहर या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
तसेच एलइडी शोच्या माध्यमातुन नागरिकांत स्वच्छता विषयी जनजागृती (Swachh Bharat Abhiyan) करण्यात आली. यावेळी नगरपचायत कर्मचारी, सफाई कर्मचा री आणि नागरिकांनी स्वयंफुर्त सहभाग घेतला. हा उपक्रम नगरपंचायत कांद्री (कन्हान) चे मुख्याधिकारी सचिन गाढवे यांच्या मार्गदर्शनात पथनाटय पथक, नगरपचायत कर्मचारी बेबीनंदा लिंगायत, ज्ञानेश्वर वैद्य, पंकज मस्के, सोनु मधुमटके, सतिश मधुमटके, चंदा वैद्य, रोषण नाहारकर, गब्बर इंगोले, मनोज मधुमटके, मोहित बरसे, लकेश मेथिया, आनंद समशेर, संजय कुमार शिंदे आदी सह कर्मचाऱ्यांनी यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.