नवी दिल्ली/ हैद्राबाद (Farmer Waived Off) : देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा (Telangana Congress) राज्य सरकारने 2018 ते 2023 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांच्या सरकारने कर्जमाफीची (Farmer Loan Waiver) घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाणार आहे. 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले 2 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, लवकरच कर्जमाफीचे तपशील सरकारी आदेशात जाहीर केले जातील, असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांनी सांगितले आहे.
आर्थिक बोजा किती असणार?
राज्य सरकारवरील आर्थिक बोजाबाबत CM रेड्डी यांनी सांगितले की, कर्जमाफीमुळे राज्याच्या बजेटवर सुमारे 31,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील BRS सरकारने 1 लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न करून शेतकरी आणि शेतीला अडचणीत आणल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे सरकार 2 लाख रुपयांच्या (Farmer Loan Waiver) शेतकरी कर्जमाफीचे निवडणूक आश्वासन पूर्ण करत आहे, असे (CM Revanth Reddy) मुख्यमंत्री म्हणाले.
झारखंड सरकारने सुद्धा केली कर्जमाफीची घोषणा
यापूर्वी झारखंडमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (CM Champai Soren) त्यांच्या आघाडी सरकार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करेल. यासोबतच मोफत विजेचा कोटा 200 युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (Farmer Loan Waiver) शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. BRS चा पराभव करून (Telangana Congress) काँग्रेसने राज्यात सत्ता मिळवली आणि ए रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री केले. आता लोकसभा निवडणुकीनंतर रेड्डी (CM Revanth Reddy) यांनी राज्यात कर्जमाफीची घोषणा केली आहे.