Yawatmal :- शहरातील दारव्हा रोड परिसरातील अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या मामा भांजे हॉटेलच्या जवळ भाडेकरू मुलाने घरमालकाचा खुन (Murder) केला असल्याची घटना बुधवारी घडली आहे.
शिविगाळ करण्याच्या कारणावरून वाद
घरमालक जंगलु वाणु आडे यांचे आरोपी भाडेकरू करण विनायक घोरपडे याच्या सोबत शिविगाळ करण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादावादीनंतर आरोपी विनायक घोरपडे याने घरमालक जंगलु आडे रा. गजानन महाराज मठाजवळ लोहारा यांची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेचा तपास अवधूतवाडी पोलिस स्टेशनच्या (Police Station) वतीने करण्यात येत आहे. मृतक हे आपल्या घरी एकटेच राहत असल्याची माहिती आहे. क्षुल्लक कारणावरून घरमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहे.