गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
परभणी (Tertiary Case) : परभणीतील गंगाखेड शहरात तृतीयपंथीयांच्या गुरु-शिष्य वादात गुरु माणण्यावरून भर रस्त्यात झालेल्या फ्रिस्टाईल मारा-मारीत एका गटातील चौघांनी दुसऱ्या गटातील 2 तृतीयपंथीयांना थापड बुक्क्या व ब्लेडने मारून जखमी केल्याची घटना सोमवार 14 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास शहरातील बस स्थानक परिसरात घडली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. याप्रकरणी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 तृतीयपंथीयाविरुद्ध परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सय्यद सानिया सय्यद अजीज, श्रेया निवृत्ती कुलकुलवाड हे सोमवार 14 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील भाजी मंडई परिसरात पैसे मागत- मागत बस स्थानक परिसरात आले असता 1) शब्बो, 2) रेश्मा, 3) आशिका, 4) प्रियंका सर्व रा. सेवकनगर नाला, बेलेश्वर मंदीराजवळ, परभणी यांनी तुम्ही आमचे शिष्य व्हा असे सांगितले, तेंव्हा आम्ही तुमचे शिष्य होणार नाही, आमचा गुरु मुस्कान आहे. असे फिर्यादीने (Prosecutor) म्हणताच त्या चौघांनी सय्यद सानिया व श्रेया कुलकुलवाड या दोन्ही तृतीयपंथीयांना (Tertiary) चापटा- बुक्याने गालावर, पाठीवर मारुन मुक्का मार देत शब्बो व रेश्मा यांनी सय्यद सानियाच्या डाव्या हाताच्या दंडावर, पाठीवर व श्रेयाच्या डाव्या हाताचे मनगटावर ब्लेडने मारुन जखमी करत तुम्ही आमचे शिष्य झाले नाही, तर तुम्हाला गंगाखेड येथे पैसे मागु देणार नाही. तुम्हाला जिवे मारु अशी धमकी दिल्याची फिर्याद सय्यद सानिया सय्यद अजीज वय 25 वर्ष रा. आनंद नगर परभणी या तृतीयपंथीयाने दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात 4 तृतीयपंथीयाविरुद्ध परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस करीत आहेत.