Manora :- पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर वसंता वानखेडे (२६) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली.
आरोपी ज्ञानेश्वर वानखेडे याला दिग्रस येथून ताब्यात घेवून केली अटक
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार एका गावातील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला २१ जून ला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी मानोरा पोलीस स्टेशनला दाखल केल्या नंतर मुलीला व आरोपी ज्ञानेश्वर वानखेडे याला दिग्रस येथून ताब्यात घेवून अटक केली. पोलिसांनी १४ जुलै ला न्यायालयात हजर केले असता १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीवर कलम १३७ (2) व बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. कलम ६४ (i), (m) गुन्ह्यात वाढ झाली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. राम सरोदे, जमादार विनोद राठोड, चेतन भोयर हे करीत आहे.